जिल्ह्यात उद्योग वाढीसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा पुढाकार

सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रश्न विचारून जाणून घेतले जिल्हा वासीयांची मते

0

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क

जळगावला सुवर्णनगरी, पाईप नगरी, केळी नगरी म्हणून सुद्धा ओळखले जाते. जिल्ह्यातून देशाच्या अनेक कानाकोपऱ्यात जाण्या – येण्यासाठी लोहमार्ग आणि रस्ते महामार्ग उपलब्ध असल्यावरही अनेक उद्योग जळगाव जिल्ह्यातून बाहेर पडले किंवा अनेक उद्योग हे बंद पडले त्यामुळे अनेकांना रोजगारासाठी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर यासारख्या मोठ्या शहरांमध्ये जावे लागण्याची परिस्थिती सध्या दिसून येत आहे. मात्र जिल्ह्यातच मोठ्या प्रमाणावर उद्योगांची निर्मिती होऊन अनेकांना रोजगार मिळून जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळावी अशी अपेक्षा सर्वसामान्य जळगावकरांना आहे. याच दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात नवनवीन प्रकल्प उद्योग आणून व उद्योगाच्या त्यांना एकत्र करून जिल्ह्याच्या विकासात कशी भर टाकता येईल यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांच्या या आव्हानाला सर्वांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उद्योग निर्माण होऊन जिल्ह्याचा विकास व्हायला हवा अशी अपेक्षा आता निर्माण झाली आहे.

जिल्ह्याला नव्याने मिळालेले कर्तव्यशील, कृतिशील, उपक्रमशील ,जिल्हाधिकारी म्हणून आयुष्य प्रसाद यांनी आपल्या पदाची सूत्रे सांभाळत आपल्या कार्यशैलीचा ठसा अल्पावधीतच उमटविला असून जिल्हा वासियांच्या मनात त्यांच्याबद्दल आदराचे स्थान निर्माण झाले आहे. आज त्यांनी जळगाव जिल्ह्यावासियांसाठी अपेक्षित असलेला जिव्हाळ्याचा उद्योगांचा प्रश्न आपल्या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून जिल्हा वासियांना विचारला आहे. या तीन प्रश्नांच्या माध्यमातून त्यांनी संवाद साधलेला असून जळगाव जिल्ह्यात उद्योजक उद्योग आणण्यासाठी व विविध उपक्रम आणि रोजगाराच्या संधी जळगाव जिल्हा वाशीयांना जिल्ह्यातच मिळाव्या यासाठी पुढाकार घेतला आहे. जळगाव शहरात असलेल्या एमआयडीसी परिसरात अनेक लहान मोठे उद्योग काही कारणाने बंद पडले किंवा इतरत्र स्थलांतरित झाले आहे. त्यामुळे रोजगारासाठी स्थानिक तरुणांना संधी प्राप्त होत नसल्याने ते नोकरीच्या शोधात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद यासारख्या ठिकाणी जात असतात. जळगाव जिल्ह्यातून मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर व देशातील अनेक कानाकोपऱ्यात जाण्या येण्यासाठी रेल्वे तसेच रस्ते यासारखी दळणवळणाची साधने उपलब्ध आहेत. मात्र इतके असतानाही स्थानिक लोकप्रतिनिधी अथवा शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्ष म्हणा किंवा जाणून-बुजून अनेक उद्योग प्रकल्प हे जिल्ह्याबाहेर गेलेले दिसत आहेत. उद्योगांसाठी आवश्यक 24 तास वीज पाणी आवश्यक असल्याने सोशल मीडियाच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर युजर्स यांनी आपले मते व्यक्त केले असून यात काहींनी लोकप्रतिनिधी आणि शासनची उदासीनता याला कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.

यात म्हटले आहेत की,सर्व प्रथम सर MSME च्या खुप साऱ्या योजना आहे ते नवीन उद्योजकांना माहित नाही त्यासाठी काही कार्यशाळा आयोजित करावे. सर भारत लवकर top-3 economy होणार आहे. आज पुण्याकडे खुप सारे उद्योग आकर्षित होत आहे. त्याकरिता पुणे मॉडेल वापरून आपण पण मोठ-मोठे उद्योग आकर्षित करू असे म्हटले आहे.

तर एका युजर्सना म्हटले आहे की, विमानतळाचे अपग्रेडेशन आणि कार्गो टर्मिनलची स्थापना, एमआयडीसीला २४x७ पाणी, वीजपुरवठा, योग्य पायाभूत सुविधांसह नवीन नियोजित MIDC. सीसीटीव्ही, औद्योगिक क्षेत्रातील असामाजिक घटकांवर कडक नियंत्रण. SEZ ची स्थापना किंवा अन्य उपाय योजावेत असे म्हटले आहे. जळगावची कनेक्टिव्हिटीसाठी विमानतळ सुरू करावे कारण उद्योजकांना त्वरित जळगावला येणेजाणे सोपे होईल असे एका युजरने सुचविले आहे.

संबंधित प्रश्न व लिंक
जळगाव मधील उद्योजक, उद्योग आणि उपक्रमांची संख्या वाढवण्यासाठी आपण कशी मदत करू शकतो?
https://twitter.com/JalgaonDM/status/1698198910752395601?s=20

जळगावातून केळी आणि पीव्हीसी पाईप्सची निर्यात कशी वाढवता येईल? जळगावला सोन्याच्या उत्पादनाचे प्रमुख केंद्र कसे बनवायचे?
https://twitter.com/JalgaonDM/status/1698214326790967355?s=20

जळगावातून निर्यात कशी वाढवता येईल?
https://twitter.com/JalgaonDM/status/1698222739839160325?s=20

यावर प्रतिक्रिया देताना एका युजरने म्हटले आहे की जळगावात विमानतळावर वर Night Landing व Flight Training Institute सुविधा असून सुद्धा एकही Flight इतर शहरात जात नाही,म्हणजे Airport Operational नाही,त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. कृपया एअरपोर्ट परत सुरू होण्यास विनंती आहे. जळगाव जर मोठे उद्योग आणायचे असतील तर उद्योजकांसाठी विमान सुविधा, 24 तास वीज पाणी सुविधा उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.

दरम्यान जळगाव शहरासह जिल्ह्यात अनेक लहान मोठे उद्योग सुरू केल्यास व त्यांना पुरेशा सोयीसुविधा मिळाल्यास जळगाव जिल्ह्याचा विकास हा मोठ्या प्रमाणावर होऊन हजारो बेरोजगारांच्या हाताला रोजगार प्राप्त होईल असे वाटते.

Leave A Reply

Your email address will not be published.