रामदास कदमांच्या वक्तव्याचा निषेध; पारोळ्यात रास्ता रोको

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पारोळा येथे माजी मंत्री रामदास कदम यांच्या वक्तव्याचा निषेध करित पारोळा शिवसेनेच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांच्या नेतृत्वाखाली महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

रामदास कदम यांनी काल उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात जी पातळी सोडून भाषा वापरली, त्याचा सार्वत्रिक निषेध होणे आवश्यक आहे. टीका करताना  अर्वाच्यपणा किती करायचा याला काही मर्यादा आहेत. हा माणूस महाराष्ट्राचा मंत्री होता आणि पन्नास वर्षे शिवसेनेत होता. आपल्या अगोदरच्या नेत्याबद्दल  इतके हीन स्वरूपाचे उद्गार ते कसे काय काढू शकतात ! टीका अवश्य करा, परंतु काही विवेक बाळगाल की नाही ? रामदासभाईंना उत्तर देताना भास्कर जाधव यांनीही आपले भान सोडले, माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मात्र मर्यादा पूर्णपणे सोडून महाराष्ट्राच्या  राजकारणाची आणखीनच अधोगती करण्याचा व राजकीय प्रदूषण वाढवण्याचा चंग बांधलेला दिसतोय. एकनाथजी रामदासभाईंना आवरा असे म्हणून निषेध व्यक्त करतांना शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षल माने यांनी सांगितले.

यावेळी तालुकाप्रमुख आर. बी. पाटील, शहरप्रमुख अशोकभाऊ मराठे, उपतालुका प्रमुख दादा पाटील, जिल्हाध्यक्ष एकलव्य सेना सुनील पवार, युवासेना तालुकाप्रमुख रविंद्र पाटील, शहरप्रमुख युवासेना आबा महाजन, युवासेना उपशहर प्रमुख सावन शिंपी, अल्पसंख्याक शहर प्रमुख कलीम शेख, तालुकाध्यक्ष

व्यापारी आघाडी राजेंद्र चौधरी, दिलीप चौधरी, जेष्ठ शिवसैनिक रविंद्र पाटील, अरुण चौधरी, आप्पा चौधरी, राजू भाऊ बागडे, लखनभाऊ वाणी, विलासभाऊ पाटील, बापूभाऊ बडगुजर, आबा सैदाने आदी शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here