परभणीत पुन्हा एका तरुणाची मराठा आरक्षणासाठी आत्महत्या

0

परभणी, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाकडून मराठा आरक्षणाची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकार दरबारी प्रलंबित आहे. याचदरम्यान, परभणीत गेल्या ४८ तासांत मराठा समाजाच्या दोन तरुणांनी आत्महत्या केली आहे.

परभणीत हेल्या दोन दिवसात मराठा समाजाच्या दोन तरुणांनी जीवन संपवलं आहे. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील पिंपरी झोला येथील २५ वर्षीय तरुणाने जीवन संपवलं आहे. पवन विष्णुकांत भिसे या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी पवनने चिठ्ठी लिहून जीवन संपवलं आहे.

तरुणाने विष पिऊन संपवलं जीवन
मराठा आरक्षणासाठी एका 36 वर्षीय तरुणाने विषारी द्रव पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परभणी तालुक्यातील आर्वी येथे ही घटना घडली. गुरुवारी सकाळी ही घटना घडली. सुनिल छत्रपती कदम (36) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.