पंकज त्रिपाठींवर कोसळला दुःखाचा डोंगर, वाचा सविस्तर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्या ‘OMG २’ मुळे लोकप्रियतेच्या शिखरावर असणारा पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पंकज त्रिपाठींचे वडील पंडित बनारस तिवारी यांचे निघणं झाले आहे. ते ९८ वर्षांचे होते.

त्यांच्या मूळगावी बेलसंड येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंकज त्रिपाठी वडिलांच्या खूप जवळचे होते. वडिलांच्या जाण्याने त्यांना अतिशय दुःख झालं आहे. पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांचे निधन नेमके कोणत्या आजाराने झाले किंवा वृद्धपकाळाने त्यांच निधन झालं, हे अध्यतरी कळू शकलेले नाही. दरम्यान पंकज यांचे चाहते मात्र त्यांच्यावर असलेलं वडिलांचं छत्र हरपल्याने हळहळ व्यक्त करत आहे.

वडिलांना पंकज यांच्या कामांची माहिती नव्हती
पंकज त्रिपाठी हे बिहारमधील गोपालगंज भागातील रहिवासी आहे. अभिनेता करिअरच्या निमित्ताने मुंबईत राहत असतांना वडील आणि आई गावात राहत होते. एका वृत्त वाहिनीशी बोलत असतांना पंकज त्रिवाठी यांनी सांगितले की, “मुलगा काय करतो, कुठे काम करतो अशा गोष्टींमध्ये पंकजच्या वडिलांना अजिबात रस नव्हता. याशिवाय मुलगा पंकज त्रिपाठी चित्रपटसृष्टीत काय काम करतो हेही त्यांना माहित नव्हते.

Leave A Reply

Your email address will not be published.