पाळधीसह 22 गावांनी टाकला सुटकेचा निःश्वास

0

पाळधी ता. धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

पश्चिम रेल्वेलाईनवरील गेट नं 153 (चांदसर गेट) हे कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या ठिकाणी बोगदा बनवला जाणार आहे. पाळधीसह, झुरखेडा, निमखेडा, धार, शेरी, पथराड बु, पथराड खु, रेल, लाडली, सोनवद, चांदसर, चोरगाव, कवठळ, टहाकळी, वंजारी, खपाट यांच्यासह जोडल्या गेलेल्या सुमारे 22 गावांना या गेट नंबर 153 (चांदसर गेट)मुळे पाळधीला त्वरित पोहोचता येते.

हा गेट बंद केल्यामुळे या 22 गावांना दूरचा फेरा पडणार आहे. याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे पाळधी गावातून वाहनांची वर्दळ जास्त होऊन गावातील लहान रस्त्यामुळे ट्रॅफिक, अपघाताचा धोका संभवत होता. या कारणांमुळे पाळधीवासीयांचा रेल्वे प्रशासनाच्या नियोजित मार्गाला विरोध होता.

कोरोनातून बरे झाल्यावर मंत्री महोदय ऑन फिल्ड

आज सकाळी पश्चिम रेल्वेचे सहायक अभियंता डी के शुक्ला रेल्वे यांनी पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा ना. गुलाबरावजी पाटील यांची त्यांच्या घरी भेट घेतली. या बैठकीत मंत्रीमहोदय व जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांनी पर्यायी रस्ता सुचवला.

जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांनी स्वतः पायी फिरून रेल्वे अधिकाऱ्यांना सुचवलेला पर्यायी मार्ग दाखवला. या पर्यायी मार्गाने रेल्वे अधिकारी आश्वस्त झाले, तुम्ही सुचवलेल्या पद्धतीनेच मार्ग काढला जाईल तोपर्यंत गेट नंबर 153 बंद केला जाणार नाही असे आश्वासन जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांच्यासहीत उपस्थितांना दिले.

यावेळी उपसरपंच चंदन कळमकर, ग्राप सदस्य चंदू माळी, समाजसेवक चंदू पवार, सोनू माळी, समाधान माळी, मच्छिद्र साळुंखे, बंडू पाटील, पथराड माजी सरपंच अभिमान पाटील व पाळधीसह आजूबाजूच्या गावातील प्रतिष्ठित नागरिक होते.

Leave A Reply

Your email address will not be published.