भारतीय म्युझिक इंडस्ट्रीचा पर्दाफाश, काय म्हणाला प्रसिद्ध गायक

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

गायक पालाश सेन (Palash Sen) यांनी अजुनक एक बॉलीवूड (Bollywood) संदर्भात खुलासा केला आहे. गायक पलाश सेन  याने अनेक शानदार गाण्यांना आवाज दिला आहे. अर्थात दीर्घकाळापासून तो लाईमलाईटपासून दूर आहे. पण आता पलाश पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रिॲलिटी शो (Reality Show) आणि लाइव्ह स्टेज परफॉर्मन्स आणि कॉन्सर्टबद्दल त्याने काही धक्कादायक खुलासे केले आहेत. सध्याचे ९९ टक्के लाइव्ह स्टेज परफॉर्मन्स हे फेक असल्याचं त्याने म्हटल आहे. एका मुलाखतीत पलाशने अनेक उदाहरणं देत भारतीय म्युझिक इंडस्ट्रीचा पर्दाफाश केला. प्रेक्षकांची कशी दिशाभूल केली जाते, असा खळबळजनक खुलासा त्याने केला आहे.

त्याचप्रमाणे पलाशने Dannii Minogueचं उदाहरण देत सांगितलं की, डॅनीचा ऑस्ट्रेलियात लाईव्ह शो होता. प्रचंड गर्दी होती. पण ती लाईव्ह गात नसून फक्त लिपसिंक करत असल्याचं प्रेक्षकांच्या लक्षात आलं आणि लोकांनी तिला अंडी फेकून मारली होती. भारतात लोकांना काय खोटं, काय खरं कळेल तेव्हा ही स्थिती बदलेल. अरिजीत सिंग (Arijit Singh), सोनू निगम (Sonu Nigam), शंकर महादेवन (Shankar Mahadevan), दलेर मेहंदी (Daler Mehndi), सुनिधी चौहान (Sunidhi Chauhan) असे काही सिंगर लिप सिंक न करता लाईव्ह गातात. पण उर्वरित ९९ टक्के सिंगर फक्त रेकॉर्ड केलेले ट्रॅक वाजवतात.

Leave A Reply

Your email address will not be published.