पहूर येथे चहाच्या हाॅटेलला आग ; २ लाख रूपयांचे नुकसान

0

पहूर ,ता.जामनेर;– पहूर बसस्थानकावरून हाकेच्या अंतरावर असलेल्या चहाच्या हाॅटेलला अचानक आग लागली यात २ लाख रूपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले.

पहूर बसस्थानकावरून हाकेच्या अंतरावर असलेल्या कृषी पंडीत मोहनलाल लोढा काॅम्पलेक्स मधील श्री . पितांबर कलाल यांच्या जय सप्तशृंगी माॅं, टी सेंटर या चहाच्या दुकानाला रात्री १ ते २ वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली यात फर्निचर, फ्रीज, चहाचे साहित्य, चहापत्ती पावडर व रोख रक्कम जळून खाक झाली असून एकूण २ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. याठिकाणी पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस श्री. भरत लिंगायत व श्री. रविंद्र देशमुख यांनी पाहणी करून पंचनामा करून अकस्मात आग लागल्याची पहूर पोलीस स्टेशन ला दाखल करण्यात आली आहे.पुढील तपास पहूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाॅ भरत लिंगायत हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.