शिंदाड येथे विविध विकास कामाचे लोकार्पण व प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन

0

शिंदाड ता. पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

शिंदाड ता. पाचोरा जि प गटात विविध विकास कामाचे लोकार्पण व प्राथमिक आरोग्य केंद्राचा उद्घाटन सोहळा दिनांक २९ जानेवारी २०२२ शनिवार रोजी खासदार उन्मेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या उदघाटन सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हापरिषद अध्यक्षा जळगाव रंजना प्रल्हाद पाटील, पाचोरा, भडगाव तालुक्याचे आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार तथा भा.ज.पा.जिल्हाध्यक्ष जळगावचे सुरेश भोळे, जिल्हापरिषद जळगावचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद जळगावचे पंकज अशिया, पिंपळगाव हरेश्वर, शिंदाड गटाचे जिल्हापरिषद सदस्य मधुकर भाऊ पाटील (काटे), भाजपा तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे, आरोग्य अधिकारी जिल्हापरिषद जळगावचे डॉ. भिमाशंकर जमादार, जिल्हापरिषद सदस्या विजयाताई पाटील, पंचायत समिती सदस्य वसंतराव गायकवाड, पंचायत समितीच्या उपसभापती अनिताताई चौधरी, पाचोरा पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष पाटील, पाचोरा पंचायत समितीचे माजी सभापती बंन्सीलाल पाटील, पाचोरा पंचायत समितीच्या माजी उपसभापती रत्नप्रभाताई पाटील, माजी उपसभापती अनिताताई पवार, तालुका आरोग्य अधिकारी समाधान वाघ, वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय डॉ. शेखरदादा पाटील हे उपस्थित राहणार आहेत.

तरी पंचक्रोशीतील जनतेने या उदघाटन सोहळ्यात येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती शिंदाड गावचे प्रथम नागरिक सरपंच ज्ञानेश्वर तांबे व उपसरपंच नरेंद्र पाटील, सदस्य व ग्रामस्थांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.