धनादेश अनादर प्रकरणी कुऱ्हाड येथील इसमास ६ महिने शिक्षा व दंड

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

पाचोरा

लोहारा ; येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज पतसंस्थेचे कर्जदार श्री.तानाजी युवराज पाटील, रा.कुऱ्हाड, ता.पाचोरा येथील मे.कोर्टाने ६ महीन्यांची शिक्षा व दंड भरण्याचे आदेश जारी केले.

सविस्तर वृत्त असे की, लोहारा, ता.पाचोरा श्री छत्रपती शिवाजी महाराज पतसंस्थेचे कर्जदार तानाजी युवराज पाटील,

रा.कुऱ्हाड, ता.पाचोरा येथील सभासद यांनी पतसंस्थेकडून दि.२७/०४/२०१० रोजी कर्ज रक्कम ₹.६० हजार घेतलेले आहे. सदर कर्ज रक्कम भरण्यासाठी अर्जदाराने ₹.८० हजाराचा धनादेश पतसंस्थेस दिला होता.सदरचा धनादेश न वटता परत आल्याने वकीलांमार्फत नोटीस देवुनही मुदतीत रक्कम पतसंस्थेस दिली नाही.म्हणुन पतसंस्थेने कर्जदाराविरूध्द पाचोरा येथील

मे.न्यायालयात फौ.ख.नं.९२/२०१३ ने भारतीय चलनक्षम पत्रकाचा कायदा कलम १३८ नुसार फिर्याद दाखल करण्यात आली. सदर फिर्यादीचे कामकाज मे.एफ.के.सिद्दीकी यांचे समोर चालुन मे.कोर्टाने ६ महीनेची शिक्षा व ₹.१ लाख ६० हजार फिर्यादी पतसंस्थेस १५ दिवसांत द्यावे.तसेच १० हजार दंड भरण्याचे आदेश जारी केले. फिर्यादी पतसंस्थेचे वतीने ऍडव्होकेट ए.टी.सुर्यवंशी यांनी, तर संशयित आरोपीतर्फे ॲडव्होकेट पी.बी.पाटील यांनी काम पाहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.