जिल्हाबँकेची आर्थिक बाजू भक्कम:गुलाबराव देवकर,

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

कजगाव;  ता भडगाव जिल्हा बँक आर्थिक बाबतीत मजबूत असून सर्व संचालक बँकेच्या हिताबाबत कायम आग्रही असतात त्यामुळे बँक कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. असे उदगार जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी काढले ते भोरटेक येथील नागरी सत्कार सोहळ्यात बोलत होते पुढे देवकर म्हणाले की सध्या बँक ब वर्गात असून अ वर्गात आणण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत बँकेला पुढे आणण्याची जबाबदारी आमच्या सर्व संचालकांची आहे.

शेतीसाठी खाजगी सावकारांचे पैसे परवडत नाही त्यामुळे बँक वेगवेगळ्या योजना राबवित असते तसेच बँक व शेतकरी यांच्यात समन्वय असावे असेही देवकर म्हणाले कजगाव येथून जवळच असलेल्या भोरटेक येथे माजी मंत्री तथा जिल्हाबँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांचा नगरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते भोरटेक ग्रामपंचायत विकास सोसायटी व ग्रामस्थांच्या संयुक्तिक प्रयत्नाने हा सत्कार सोहळा संपन्न झाला गुलाबराव देवकर हे भोरटेक येथील भाचे असल्याने त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण येथेच झाले त्यामुळे त्यांच्या

त्याकाळच्या बाल मित्रांनीही जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच गुलाबराव देवकर यांनी नागरी सत्कार स्वीकारून ग्रामस्थांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली यावेळी जिल्हा बँक संचालक मेहताब नाईक, भोरटेकच्या सरपंच-सुनंदा धनगर, उपसरपंच-उमेश देशमुख, विकासो चेअरमन- शिवराम पाटील, व्हा चेअरमन संजय महाजन, विकासो सचिव-अनिल देशमुख, माजी सरपंच-गोविंदा महाजन, शेतकरी नेते अशोक देशमुख, कमलशांती पतसंस्थेचे चेअरमन- प्रमोद ललवाणी, रवींद्र पाटील, अरुण पाटील,

मधुकर देशमुख, माजी सैनिक- समाधान पाटील, पंजाबराव देवकर, ग्रा प सदस्य- ज्ञानेश्वर पाटील, मंगा भिल, दिनकर भिल,राजेंद्र धनगर, सुकलाल महाजन, विनोद पाटील, व असंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन प्रा मन्साराम महाजन यांनी केले तर आभार प्रशांत पाटील यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.