पाचोरा रोटरी क्लबचे उपक्रम प्रशंसनीय

0

लोकशाही न्युज नेटवर्क

पाचोरा ; येथील रोटरी क्लब ऑफ पाचोरा – भडगाव चे सर्व उपक्रम समाजाभिमुख तसेच रोटरीच्या ध्यैय धोरणांना अनुकूल असून कोविड – १९ नंतरच्या सामान्य परिस्थितीत येथील रोटरी क्लबने घेतलेले सर्वच उपक्रम अत्यंत प्रशंसनीय असल्याचे मत प्रांतपाल रो. रमेश मेहेर यांनी व्यक्त केले. रोटरी क्लब ऑफ पाचोरा – भडगाव ला प्रांतपाल रो. रमेश मेहेर यांनी नुकतीच भेट दिली. यावेळेस त्यांच्यासमवेत उपप्रांतपाल रो. गोविंद मंत्री व उपप्रांतपाल रो. राजेश मोर उपस्थित होते.

रोटरी प्रांतपाल भेटीच्या निमित्ताने निर्मल रेसिडेन्सी च्या कॉन्फरन्स हॉलमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव चे अध्यक्ष डॉ. बाळकृष्ण पाटील व सेक्रेटरी प्रा. डॉ. पंकज शिंदे यांनी प्रांतपाल रमेश मेहेर, उपप्रांतपाल गोविंद मंत्री, उपप्रांतपाल राजेश मोर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

स्थानिक अध्यक्ष डॉ. बाळकृष्ण पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात स्थानिक क्लब विषयी माहिती दिली. तर सेक्रेटरी डॉ. पंकज शिंदे यांनी स्थानिक क्लबच्या अर्धवार्षिक उपक्रमांचा आढावा मान्यवरांच्या समोर सादर केला. उपप्रांतपाल गोविंद मंत्री यांनी प्रांतपाल रमेश मेहेर यांच्या सार्वजनिक जीवन कार्याचा परिचय करून दिला. प्रांतपाल रमेश मेहेर यांनी पाचोरा रोटरी क्लबच्या उपक्रमांचे मुक्तकंठाने कौतुक केले. तसेच रोटरीचा वैश्विक निधी उभारणीसाठी आवश्यक असलेल्या योजना व उपक्रम यांची माहिती सांगितली.

सुमारे पाऊण तासांच्या मनोगतात प्रांतपाल रमेश मेहर यांनी रोटरी उत्सव, प्रदूषण मुक्तीसाठी घेण्यात येणारे उपक्रम, समाजाभिमुख उपक्रम, आरोग्य व शिक्षण या क्षेत्रांसाठी उपयुक्त असलेले दिशादर्शक उपक्रम या बाबत चर्चा केली. याप्रसंगी पाचोरा रोटरी क्लब च्या (प्राऊड डोनर) सदस्यांचा गौरव प्रांतपाल यांच्या हस्ते पिन लावून करण्यात आला. त्यात प्रामुख्याने रो. प्रदीप पाटील, रो. डॉ. बाळकृष्ण पाटील, रो. डॉ. अमोल जाधव, रो. निलेश कोटेचा, रो. रुपेश शिंदे, रो. भरत सिनकर, रो. डॉ. पंकज शिंदे, रो. सुयोग जैन  इत्यादी मेजर डोनर सदस्यांनी रोटरी इंटरनॅशनलला प्रत्येकी शंभर डॉलर्स चा निधी दिल्याबद्दल व पाचोरा क्लबचे सदस्य उपप्रांतपाल रो. राजेश मोर यांनी तीन हजार डॉलर चा निधी दिल्याबद्दल प्रांतपाल रो. रमेश मेहेर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला रोटरी सदस्य चंद्रकांत लोढाया, रो. डॉ. प्रशांत सांगळे, रो. डॉ. पवन पाटील, रो. डॉ. गोरख महाजन, रो.रावसाहेब बोरसे, रो. डॉ. भूषण मगर (पाटील), रो. शैलेश खंडेलवाल, रो. शिवाजी शिंदे, रो. नीरज मुनोत, सह रोटरी सदस्य उपस्थित होते. रो. सुयोग जैन यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले कार्यक्रमानंतर रोटरीच्या निवडक उपक्रमांना प्रांतपाल रो. रमेश मेहर व मान्यवरांनी भेटी दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.