पाचोरा नगरपरिषदेच्या ९८ कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

दि. ९ फेब्रुवारी रोजी अमरावती येथील महानगर परीषदेच्या आयुक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याचे स्थलांतर करण्याचा विषय मंजूर केला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ तेथील काही महिलांनी आयुक्तांना घेराव घालून त्यांचे अंगावर शाई फेकल्याची घटना घडली असुन त्याचा निषेध करत पाचोरा येथील ९८ कर्मचाऱ्यांनी दि. १० फेब्रुवारी रोजी दिवसभर लेखणी बंद आंदोलन केले.

पाचोरा नगर परीषदेत एकुण २०४ कर्मचारी असून त्यापैकी आरोग्य विभाग व सफाई कामगार, पाणी पुरवठा विभाग या अत्यावश्यक विभाग वगळता, बांधकाम विभाग, लेखा विभाग, विज पुरवठा विभाग, वसुली विभाग, जन्म मृत्यू नोंदणी विभागासह सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी हे लेखणी बंद आंदोलनात सहभागी झाले होते.

यात मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, वसुली विभागाचे प्रमुख साईदास जाधव, सह अन्य कर्मचारी सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.