जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत वरखेडी व नगरदेवळा गुरांचे बाजार बंद राहणार – सभापती गणेश पाटील

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

पाचोरा तालुक्यातील बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील वरखेडी व नगरदेवळा येथील गुरांचे बाजार लंपी स्किन डीसीज या साथीच्या रोगामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने पुढील आदेश होई पावेतो बंद ठेवण्यात आले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील पाचोरा व भडगाव तालुक्यात व दर गुरुवारी वरखेडी तसेच दर सोमवारी नगरदेवळा येथील भरणारे गुरांचे बाजार हे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या २३ ऑगस्ट रोजीच्या आदेशानुसार लंपी स्किन डीसीज या साथ रोगाचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये आढळून आल्याने बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील पाचोरा व भडगाव तालुक्यातील गुरांचे बाजार २८ ऑगस्ट पासून बंद करण्यात आलेले आहेत.

लंपी स्किन डीसीज या साथीच्या रोगाचा जनावरांमध्ये प्रसार होऊ नये व पशुधनाची हानी होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी यांचे गुरांचे बाजार चालू करणे बाबत आदेश प्राप्त होत नाही, तो पर्यंत कोणत्याही शेतकऱ्याने व व्यापाऱ्याने बाजार समितीच्या गुरांच्या बाजारात गुरे व ढोरे विक्रीस आणू नये, असे आवाहन बाजार समितीचे सभापती गणेश पाटील व सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.