पाचोऱ्यात भरधाव पिकअपने चौघांना उडविले; दोन जणांनी पाय गमावले…

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

येथील महाराणा प्रताप चौकात पहाटेच्या सुमारास मुंबई कडुन येणाऱ्या बोलोरो पिकअप वाहनाने चौकातील श्री‌. दत्त मंदीराच्या ओट्यावर बसलेल्यांना धडक दिल्याने या अपघातात चौघे जखमी झाले आहेत. या दुर्दैवी घटनेत दोन जणांना आपले दोन्ही पाय गमवावे लागले आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे कि, मुंबई येथुन बुलढाणा येथे सफरचंद, किवी, मोसंबी ने भरलेली महेंद्रा पिकअप गाडी (क्रं. एम. एच. ४८ बी. एम. ७९४३) ने १२ मे रोजी सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास मुंबई कडुन बुलढाण्याच्या दिशेने भरधाव वेगात जात असतांना महाराणा प्रताप चौकातील श्री. दत्त मंदीराच्य ओट्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, ओट्यावर बसलेल्या दोघांच्या दोन्ही पायाचे तुकडे होवुन जागीच पडले. घटनास्थळी अपघातानंतर एकच हाहाकार उडाला व रक्ताचा सडा पडला होता. काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठत तात्काळ रुग्णवाहिका बोलवून जखमींना पुढील औषध उपचारासाठी येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान गाडी चालकावर संतप्त जमावाने रोष व्यक्त करत असतांना सचिन सोमवंशी, पो.कॉ. योगेश पाटील, राहुल बेहरे, रा.काँ चे प्रकाश भोसले, प्रा. सी.एन. चौधरी यांनी जमाव शांत करण्यासाठी प्रयत्न केले.

या अपघातात विनोद बारकु पाटील(३५), कुंदन सुनिलसिंग परदेशी (१७) रा. पुनगाव ता. पाचोरा तर अमोल वाघ(२६) हा पाचोरा येथील आहे तर वसंत भाईदास पाटील (४२) हे जखमी झाले. विनोद पाटील व वसंत पाटील यांचे दोघे पायाचे जागेवर तुकडे पडले होते. दरम्यान पिकअप चालक मालक पवन रतनसिंग गोटी रा. वसई व क्लिनर सावन भरतसिंग गोटी रा. वसई या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अपघातात घटनास्थळी असलेल्या मोटरसायकल क्रं. एम. एच. १९ ई. डी. ३४९२ हिचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

डॉक्टरांच्या रक्तदानाने वाचले प्राण…

विनोद पाटील यांच्यासाठी ए.बी. पॉझिटिव्ह हे रक्तगट असलेले रक्ताची गरज भासत होती. त्यात या दुर्मिळ रक्तगटाचे रक्त इतक्या सकाळी कुठुन मिळणार म्हणून डॉ. सागर गरुड आणि सचिन सोमवंशी यांनी लिलावती हॉस्पिटलचे डॉ. वैभव सुर्यवंशी यांच्याशी संपर्क केल्यावर त्यांनी तात्काळ रक्तदान केले आणि विनोद पाटील यांना तात्काळ रक्त देण्यात आल्याने त्यांचा जीव वाचला.

Leave A Reply

Your email address will not be published.