अखेर महविकास आघाडीच्या आंदोलना यश

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

जळगाव ते चांदवड या राष्ट्रीय महामार्गाचे गेल्या ४ वर्षांपासून ठीक ठिकाणी काम रखडलेले होते. सदर रखडलेल्या कामामुळे जनतेला प्रचंड यातना सहन कराव्या लागत होत्या. सदर रस्त्याचे रखडलेले काम आहे. त्या स्थितीत डांबरीकरण करून पूर्ण करण्यात यावे व जनतेला होणारा त्रास थांबवावा. यासाठी दि. २१ फेब्रुवारी २०२३ रोजी महाविकास आघाडीच्या माध्यमातून माजी आमदार दिलीप वाघ, संजय वाघ, वैशाली सूर्यवंशी, सचिन सोमवंशी, नितीन तावडे, ई यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा ते कजगाव दरम्यान ५ ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. सदर रास्ता रोको आंदोलनाच्या दिवशी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांच्या उपस्थितीत सदर कामासाठी तातडीने ९ कोटी रुपयांच्या कामाचे अंदाजपत्रक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले असून, या अंदाजपत्रकास ताबडतोब मंजुरी घेऊन हे काम त्वरित सुरू करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले होते. या आश्वासनाप्रमाणे राष्ट्रीय महामार्गाच्या संचालकांनी महाराष्ट्र राज्याच्या बांधकाम विभागास सदर काम मंजूर करण्यात येत असून त्यासाठी ९ कोटी २० लाख रुपये या रकमेस मान्यता देण्यात आल्याचे कळविले आहे. सदर रस्त्याच्या कामास यामुळे ताबडतोब गती मिळणार असून जनतेचा प्रवास हा सुखकर होणार आहे. महाविकास आघाडीने केलेल्या आंदोलनास मोठ्या प्रमाणावर यश प्राप्त झाले असून यामुळे नागरिकांनी महाविकास आघाडीचे सर्व वाहनधारकांनी व इतर संघटनांनी अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.