अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपी पोलीसाच्या ताब्यात

0

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

वरणगाव-बोदवड तालुक्यातील व वरणगाव पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या गावातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली असून आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या बाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार वरणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील गावात अल्पवयीन मूलगी हि आपल्या काकाच्या गच्चीवर सुकण्यासाठी टाकलेले कपडे काढण्यासाठी गेली असता, गावातीलच डिगंबर कैलास पाटील (२०) याने पिडीत अल्पवयीन मुलीचा गच्चीवर जाताना तिचा पाठलाग करीत माझ्याशी बोल असे म्हणत तीचा हात धरून तीला लज्जा वाटेल असे कृत केल्याने पिडीतीच्या फिर्यादीवरून आरोपी डिगंबर पाटील याच्या विरोधात पोस्को कायद्यानुसार वरणगाव पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून घटनेचा तपास उपनिरिक्षक किशोर पाटील हे करीत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.