अर्ध्या रात्री नगरदेवळा धरणातील खोदकाम ग्रामस्थांनी रोखले

0

पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क

पाचोरा तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे ४० हजार हून अधिक लोकसंख्येच्या नगरदेवळा या गावास अनेकदा भीषण पाणीटंचाईचा अनेकदा सामना करावा लागतो. अशातच येथील अग्नावंती धरणात निपाणे येथील शेतकरी करीत असलेल्या बेकायदेशीर पाइपलाइन खोदकाम नगरदेवळा येथील शेतकरी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व जागरूक नागरिकांनी दि.१० एप्रिल रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास पकडुन संबंधित शेतकरी, दोन जे. सी. बी. व ट्रॅक्टर भरलेले पाइप नगरदेवळा औट पोस्टला जमा केले.

दिवसभर या विषयाचीच गावात चर्चा सुरू असून अनेकदा पााणीटंचाईचा सामना करावा लागणाऱ्या ग्रामस्थांमध्ये संताप पसरला असून संंबंधित बेकायदेशीर पाइपलाइन करणाऱ्या शेतकरीला जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कायदेशीर कारवाई करून जरब बसावी जेणेकरून भविष्यात कोणीही असे बेकायदेशीर कृत्य करणार नाही. यासाठी रात्री गावातील नागरीक व शेतकरी मोठ्या प्रमाणावर पोलीस औट पोस्टला उपस्थित झाले. दुपारी तीन वाजता शाखा अभियंता के. बी. देशमुख यांनी नागरिकांना याबाबतीत उत्तरे दिली. परंतु नागरिकांचे त्यांच्या उत्तरांनी समाधान झाले नाही.

सध्या गावाला आठवड्यातून एकदाच पिण्याचे पाणी मिळते. त्यामुळे गावातील धरणाचे पाणी गावातील जनतेसाठीच राखीव राहिले पाहिजे असा पवित्रा नागरिकांनी घेतला होता. परंतु धरणातील उपयुक्त पेयजल साठा वगळता जलसंपदा विभागाकडे अर्ज करून शेतकरी पाणी घेवू शकतात असे शाखा अभियंता यांनी सांगितल्यावर अर्ध्या रात्रीच्या सदर विनापरवाना बेकायदेशीर पाइपलाइन खोदकामावर आपल्या स्तरावरून कुठली कार्यवाही करण्यात येईल असे विचारले असता माफीनामा घेवून संबधित शेतकऱ्याचे वाहन सोडण्यात येईल.

तसेच याबाबतीत कुठलीही दंडात्मक कारवाईची तरतूद जलसंपदा विभागाकडे नसल्याचे त्यांनी यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. शाखा अभियंता देशमुख यांच्या या स्पष्टीकरणामुळे नागरिकांमध्ये अधिकच संभ्रम निर्माण झाला असून या माफीच्या धोरणामुळे अशा घटना पुन्हा पुन्हा घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावेळी त्यांच्या समवेत कालवा निरीक्षक एन.जे पाटील उपस्थित होते.

मोठ्या लोकसंख्येच्या नगरदेवळा शहरातील महिलांना डोक्यावर हंडे घेऊन पूर्वीप्रमाणे पाण्यासाठी पायपीट करायची भीषण वेळ पुन्हा येऊ नये, म्हणून जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रकरण गांभीर्याने घेऊन या अवैध पाईपलाईन प्रकरणावर पडदा न टाकता जरब बसेल अशी योग्य ती कारवाई करावी. अन्यथा महिलांना आंदोलन करावे लागेल.

अभिलाषा रोकडे (राष्ट्रवादी युवती तालुका प्रमुख)

Leave A Reply

Your email address will not be published.