पाचोऱ्यात संत श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त उद्या पालखी सोहळा

0

पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क
शहरातील पुनगाव रोडवरील गजानन महाराज नगर येथील संत गजानन महाराज मंदिरात गजानन महाराज यांच्या १४५ व्या प्रकट दिनानिमित्त उद्या १३ फेब्रुवारी रोजी महाआरती व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

सकाळी ७ वाजता श्री. गजानन महाराज यांची महापूजा, सकाळी ८ वाजता श्री. गजानन महाराज मंदिरापासुन ते श्रीराम मंदिरा पर्यंत श्री. गजानन महाराज यांची संजीवन पादुका पालखी मिरवणूक, सकाळी ११:३० वाजता श्री. गजानन महाराज मंदिरात महाआरती व सकाळी ११:३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या भक्तीमय कार्यक्रमाचा परिसरातील जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.