पाचोरा येथे २६ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस,अजित पवार येणार

0

पाचोरा ;– पाचोरा येथे राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाच्या उपस्थितीत दि.२६ ऑगस्ट रोजी शासन आपल्यादारी हा उपक्रम घेण्यात आला आहे.

 

या कार्यक्रमाच्या पूर्व तयारीसाठी दोन्ही तालुक्यातील प्रशासनातील सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना आ. किशोर पाटील यांनी दि.७ रोजी सायंकाळी पाच वाजता प्रांताधिकारी दालनात दोन्ही तालुक्यातील सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. राज्य सरकारच्या वतीने शासनाच्या विविध योजनांतर्गत लाखो लाभार्थ्यांना या कार्यक्रमात लाभ देण्यात येणार असून मतदार संघात अनेक विकासकामांचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती आमदारांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

यावेळी जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, बाजार समिती सभापती गणेश पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, तालुकाप्रमुख सुनील पाटील, प्रांताधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार प्रवीण चव्हाणके, मुख्यधिकारी शोभा बाविस्कर, स्विय्य साहाय्यक राजेश पाटील,दोन्ही तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

आ.किशोर पाटील यांनी सविस्तर माहिती देतांना सांगितले कि, राज्य सरकारच्या वतीने सर्व घटकातील गोरगरीब जनतेला शासनाच्या विविध योजनांचे लाभ देण्यासाठी जनतेच्या हितांची शासन आपल्या दारी ही संकल्पना राबविण्यात येत आहे. राज्यात आणि जिल्ह्यात प्रथमच पाचोरा- भडगाव मतदारसंघात दि.२६ ऑगस्ट शनिवार रोजी पाचोरा येथील एमएम महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणावर महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार आणि संपुर्ण मंत्रिमंडळ या भव्य-दिव्य कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. या अनुषंगाने प्रशासनाने यासाठी सर्व स्तरावर कश्या प्रकारे तयारी करण्यासाठी आणि सूचना देण्यासाठी दोन्ही तालुक्यातील सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन त्यांना कार्यक्रमा दरम्यान कोणत्याही उणीवा, कमतरता राहू नये म्हणून आढावा बैठकीत महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत मतदारसंघातीलविविध योजनांतर्गत लाखो लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळणार आहे.त्याच सोबत पाचोरा शहरापासून तीन कि. मी.अंतरावर असलेल्या काकणबर्डी देवस्थान परिसर विकसित करण्यासाठी मंजूर केलेल्या पाच कोटींच्या कामांचे आणि याच परिसरातील १४ एकर जागे पैकी सात एकरच्या जागेत प्रलंबित असलेल्या क्रीडांगण कामाचे भूमिपूजन आणि उर्वरित जगेत वनीकरण करण्यात येणार आहे. तसेच नगरदेवळा एमआयसिडीसी चे भूमिपूजन, उपजिल्हा रुग्णालय आणि शहरातील विविध विकास कामांचे ऑनलाईन भूमिपूजन करण्यात येणार आहेत. पाचोरा शहरात समाजकल्याण विभागाचे कार्यालय आणि भडगाव येथे आरटीओ कार्यालय, मतदारसंघात अमृत पाणीपुरवठा योजना बाबत नियोजित प्रस्ताव असून भविष्यातील अनेक महत्वाची विकास कामे प्रस्तावित आहे. त्यांच्या मंजुऱ्या आणि पूर्तता झाल्या नंतर याची माहिती पुढील पत्रकार परिषदेत देणार आहे. शासन आपल्या दारी या कार्यक्रमा संदर्भात राज्य -जिल्हा स्तरावर ९० टक्के तयारी पूर्ण झाली आहे. या कार्यक्रमाला मतदार संघातील नागरिकांनी आणि लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येनेउपस्थिती द्यावी असे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.