रिचार्ज करा सांगून महिलेला ५० हजाराचा गंडा

0

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

34 वर्षीय महिलेला मोबाईलवर मेसेज पाठवून दहा रुपयांचा रीजार्ज करा, असा मॅसेज पाठवून भामट्याने 50 हजारांचा गंडा घातल्याच्या प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर (Muktainagar Police) पोलिसात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुक्ताईनगर येथील वनविभागात कर्मचारी असलेल्या वैशाली अनिल कुलकर्णी (वय 34, रा. पंचायत समिती कार्यालयामागे, मुक्ताईनगर) यांनी पोलिसांत तक्रार दिली. वैशाली या ऑनलाईनद्वारे वीज कंपनीचे बिल भरत असताना त्यांनी एका क्रमांकावर संपर्क साधला. दरम्यान, समोरील व्यक्तीने त्यांना एक लिंक पाठवून दहा रुपयांचा रीचार्ज करा, असे सांगण्यात आले. संभाषण सुरू असताना कुलकर्णी यांनी लिंकवर क्लिक करताच सदर महिलेच्या स्टेट बँक शाखेतून 50 हजार 50 रुपयांची कपात झाली.

दरम्यान याप्रकरणी वैशाली अनिल कुलकर्णी यांनी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली असून अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास प्रभारी निरीक्षक राजेंद्र गुंजाळ करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.