KYC च्या नावाने तरूणीला ३९ हजाराचा चुना; अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल

0

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

बँकेच्या खात्याची केवायसी करण्याच्या नावाखाली क्रेडीट कार्डच्या माध्यमातून पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील २५ वर्षीय तरुणीची ३९ हजाराची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील नांद्रा येथील २५ वर्षीय तरुणी हे आपल्या कुटुंबीयांसह राहते. खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. ३१ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास त्यांना अनोळखी नंबरवरून महिलेचा फोन आला. तिने सांगितले की, तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड आणि पॅन लिंक नाही. त्यामुळे तुम्हाला केवायसी करावी लागेल. यासाठीच तुम्हाला पैसे लागतील. असे सांगून अज्ञात महिलेने तरूणीला क्रेडिटकार्डचा १६ अंकी नंबर सांगण्यास भाग पाडले.

यानंतर त्यांच्या खात्यातून परस्पर ३८ हजार ९८१ रुपये वळवून घेत त्यांची फसवणूक केली. दरम्यान फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर तरुणीने पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास सहायक फौजदार रामदास चौधरी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.