एरंडोल पं. स. च्या गोदामाजवळून चोरट्यांनी लांबवली ओमनी

0

एरंडोल ;= येथील पंचायत समितीच्या गोदामाजवळ लावलेली पांढऱ्या रंगाची मारुती ओमनी गाडी चोरीस गेल्याची घटना ४ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध एरंडोल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखला करण्यात आला आहे.

शहरातील किशोर दत्तात्रय पाटील यांनी अमळनेर येथील नरेंद्र शिरसाठ या मित्राची मारुती ओमनी गाडी (एमएच- १५, बीएन- ३३००) ही घरगुती वापरासाठी आणलेली होती. याच गाडीतून किशोर पाटील हे ३ फेब्रुवारीला पद्मालय येथे सहकुटुंब देवदर्शनासाठी गेले होते. परत आल्यानंतर त्यांनी ही गाडी पंचायत समितीच्या गोदामाजवळ लावलेली होती. दरम्यान, ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ते गाडी लावलेली होती, तेथे गेले असता त्यांना गाडी चोरी झाल्याचे आढळून आले. या प्रकरणी किशोर पाटील यांनी ६ फेब्रुवारीला पोलिसा ठाणे गाठत तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तपास हेड कॉन्स्टेबल राजेशपाटील व विलास पाटील करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.