पारोळा येथे महिलेच्या बॅगेतून ८० हजारांचा ऐवज लांबविला

0

पारोळा : चाळीसगाव येथील महिला शहरातील कालीपिली वाहनात बसलेली असताना त्यांच्या बॅगेतूना अज्ञात चोरट्याने दागिने व रोकड असा ८० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना दुपारी १.३० वाजता घडलो. चाळीसगाव तालुक्यातील खडकी येथील राजश्री रावणा पाटील या पारोळा तालुक्यातील मोरफळ येथील आपल्या बहिणीकडे जाण्यासाठी पारोळा येथे आल्या होत्या,

त्या पारोव्य बस स्थानकाजवळ असलेल्या एका कालीपिली वाहनामध्ये बसल्या होत्या. त्यांच्या जवळ असलेल्या बॅगेत ७५ हजार रुपयांची सोन्याची चैन व रोख ५ हजार रुपये ठेवले होते. दरम्यान, राजश्री पाटील या मोरफळ गावी पोहोचल्यानंतर बॅग तपासली असता त्यात सोन्याची चैन व रोख रक्कम चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांनी पारोळा पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी अज्ञाता चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.