जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा आता हायकोर्टात

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

जुन्या पेंशन साठी संपूर्ण राज्यभरात संप पुकारला गेला आहे. त्याच संदर्भात मोठी अपडेट सध्यातरी समोर येत आहे. या समासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. संपात केलेल्या मागण्या बरोबर असू शकतात, पण हा संप बेकायदेशीर असल्याचे समोर येत आहे. वकील गुणरत्न सदावर्ते हे तातडीच्या सुनावणीसाठी विनंती करणार आहेत. जुन्या पेन्शनसाठी गेल्या दोन दिवसांपासून संप सुरु आहे. आज संपाचा तिसरा दिवस आहे. आता जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा हायकोर्टात गेला आहे.

विद्यार्थी आणि रुग्णांचे अतोनात हाल होत असल्याचा दाखला देत हा संप बेदायदेशीर असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे आता या याचिकेवर हायकोर्ट काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संपात फुट पडल्याचे निर्दशनास आले आहे. महाराष्ट्र राज्य महानगरपालिका, नगरपरिषद कामगार कर्मचारी संघटनेने संपातून माघार घेतली आहे. या फेडरेशनने याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कळवलं आहे. या संघटनेने १४ आणि १५ मार्च रोजी संपात आपला सहभाग नोंदवला होता. आजपासून प्रत्यक्ष काम बंद न करता काळ्या फिती बांधून काम सुरू राहील, असं फेडरेशनने लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.