म्हसवे येथून ६० वर्षीय वृध्द बेपत्ता…

0

 

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

पारोळा तालुक्यातील म्हसवे येथील ६० वर्षीय वृध्द बेपत्ता झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील म्हसवे येथील बापु दामु पवार (६०) रा,म्हसवे (ता.पारोळा) हे दि २२ रोजी च्या रात्री आठ ते सकाळी चार वाजेचा दरम्यान आपल्या राहत्या घरातून कोणालाही काही न सांगता निघुन गेले आहेत. त्यांचा सर्व नातेवाईक व इतरत्र शोध घेतला असता ते मिळुन न आल्याने  चंद्रकांत पवार यांच्या खबरी वरुन पारोळा पोलीस स्टेशनला बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास प्रविण पाटील हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.