समाजात वृध्दाश्रमाची वाढती संख्या एक दुर्दैव

0

लोकशाही विशेष लेख

म्हातारपण हे एक बालपणीचे रूप आहे असे म्हणतात,किंवा असे बऱ्याच वेळा आपल्या कानांवर ही ऐकायला येत, तर हो खर आहे याचे कारण म्हणजे व्यक्ती जसजसा म्हातारपणात किंवा उतारवयात येत जातो तसतसे तो लहान मुलांसारखे (बालिश) वागणे, चिडचिडपणा करणे, एकाच गोष्टीचा वारंवार अट्टाहास करणे असे वर्तणूक साधारणतः त्यांच्या कडून केली जाते परंतु हो साहजिकच आहे, परंतु म्हातारपणातील या असल्या सवयींना त्यांच्या मुला मुलींकडून दुर्लक्ष झाले पाहिजे जसे दुर्लक्ष याच म्हाताऱ्या झालेल्या आई -वडिलांनी केले होते त्यांची मुले मुली लहान असताना.

खूप वाईट वाटत न आजच्या काही सुशिक्षित होऊन वेल सेट अप झालेल्या मुला मुलींना की आता हे म्हातारी झालेले, चिडचिड करणारे, वयोवृद्ध झालेल्या आई वडील त्रास दायक ठरू लागतात, म्हणून शेवटी अशा काही म्हाताऱ्या आई वडिलांना त्यांची मुले मुली वृद्धश्रमाची वाट दाखवतात जे की खूप दुर्दैवी बाब आहे. असंवेदनाचा आणि निर्दयी भावनाचे उदाहरण आहे. याचाच वरवर अर्थ होतो की, जोपर्यंत गाई कडून दूध मिळत तोपर्यंत दावणीला जर भाकड झाली तर कसायला. अशीच अवस्था आपल्या समाजात काही मुलामुलींकडून आपल्या म्हाताऱ्या, वयोवृद्ध आई वडिलांची झालेली होतानाचे चित्र आहे.

वृद्धाश्रम म्हणजे घरात नको असलेली आणि विशेष म्हणजे त्यांची पालन पोषण करायला जड झालेली माणसे आणून सोडण्याचे स्थळ,असा समज काहींनी करून घेतला आहे. दिवंगत राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम (Dr APJ Abdul Kalam) यांच्या दृष्टिकोनातून तरुणांच्या जोरावरच परिवर्तन शक्य होते,परंतु हाच तरुण आपल्या जन्मदात्यांना आपल्या सोबत ठेवण्याऐवजी वृद्धाश्रमाची वाट दाखवत असेल तर हे कसे शक्य आहे.

आई वडिलांनी आपल्या मुलांना लहानचे शहाने करावे, त्यांना शिक्षण द्यावे, त्यांचे त्यांच्या शिक्षण, व्यवसाय, नोकरी तसेच उद्योगनुसार त्यांच्या साठी स्थळ बघून मोठ्या थाटाने त्यांची लग्न करून द्यावी आणि याच मुलांना तेच म्हातारी आई वडील जड वाटावे, ही अवस्था खूप वाईट आहे. आपली भारतीय संस्कृती ही मातृ पितृ देवो भव प्रकारची आहे, परंतु हे चित्र कुठे तरी वाढत्या वृध्दाश्रमाची संख्या बघता बदलताना दिसत आहे.

वृद्धाश्रम असणे तसे वाईट नाही परंतु ही वेळ आपल्या जन्मदात्याना येणे/आणणे ही संस्कृती नाही तर विकृतीच आहे. ज्या जन्मदात्या आई वडिलांनी लहानपणापासून रक्ताच पाणी करून मोठ केलं तेच मुले जर निर्दयी होणे त्या जन्मदात्यासाठी फार मोठे दुर्दैवच समजावे.

खरा आपले आणि परक्या पणाचा अनुभव आला तो कोरोना काळात.या काळात तर एवढी धन संपत्ती, समजात मान सन्मान असलेल्या व्यक्तींना सुद्धा मृत्यू नंतर कोणीच जवळ येत नव्हता ,जवळ तर जाऊ द्या हो अंत्यसंस्कार विधी साठी सुद्धा नाही भाऊ,नाही नातेवाईक नाही मित्र परिवार कोणीच पुढे येत नव्हते परंतु एवढ्या कालावधी तरी अस ऐकण्यात आले नाही की मुलासाठी त्याचे जन्मदाते आई वडील मागे सरकले म्हणून.शेवटी म्हणूनच की काय आई वडिलांना देवासम मानले जाते.आई वडिलांसारखे दैवत खरच या जगात नाही.

कुटुंब पद्धती

याचे एक कारण हेही असू शकते की,प्राचीन काळापासून भारताला एकत्र कुटुंब पद्धतीची संस्कृती लाभलेली होती. परंतु कालांतराने ही एकत्र कुटुंब पद्धत लोप होताना दिसत आहे, विभक्त कुटुंब पद्धतीही वृद्धाश्रमसाठी कारणीभूत असू शकते. आपला समाज अतिशय वाईट परिस्थीतीतून जाताना दिसत आहे.जी परिस्थिती काही मुले आपल्या जन्मदात्या आईवडिलांवर वृद्धाश्रमाची वेळ आणतात त्यांच्या पेक्षा कमनशिबी व्यक्ती कोणी असेल अस तरी वाटत नाही.

आई वडील आपल्या मुलांना मोठ्या आपुलकीने,आत्मीयतेने त्यांच संगोपन करून उच्च शिक्षण देऊन उच्च पदावर तसेच विदेशात पाठवतात आणि यातीलच काही मुलांकडे मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यविधीसाठी सुद्धा वेळ नसतो असे किती तरी उदाहरणे आपण सर्व ऐकून आहे.ज्या माता पित्याची स्वतः जन्म दिलेली मुले जर त्या माता पित्याला वृद्धाश्रमामध्ये पाठवतात आणि शेवटी त्यांच्या अंत्यविधीलाही त्यांना यायला वेळ नाही त्यापेक्षा मोठे दुर्दैव या जन्मदात्या आई वडिलांसाठी दुसरे कोणते असू शकते. जी परिस्थिती अशा वयोवृद्ध,म्हाताऱ्या आई वडीलांवर येते ती कोणावरही येऊ नये.

संस्कार आणि संस्कृती

आपल्या देशात एक चांगली संस्कृती उदयास आली आहे परंतु त्या संस्कृतीचा योग्य उपयोग जर आपल्याकडून होत नसेल तर ही खूप दुर्दैवी बाब आहे. वृद्धाश्रम ही मुळात आपली संस्कृती नाही परंतु मुलांवर संस्कृती प्रमाणे योग्य ते शिक्षण व संस्कार ही होणे ही काळाची गरज झालेली आहे.

पेराल तसे उगवते अशी उक्ती प्रचलित आहे,याच धर्तीवर आपण ज्याप्रमाणे आपल्या मुलांना संस्कार देणार आहोत तसेच संस्कार पुढे सरकवले जाते. म्हणून शिक्षण घेऊन सुशिक्षित तर व्हाच परंतु सुसंस्कृत व संस्कार ही होणे गरजेचे आहे.आई वडिलांची काळजी घेणे प्रत्येक मुलाचे आद्य कर्तव्य आहे.विशेष म्हणजे घरात आजी आजोबांच्या सर्वात जवळ असतात ती म्हणजे नातवंडे, यामधे तर जिव्हाळ्याचे व आपुलकीचे नाते असतात हे सुध्दा म्हाताऱ्या आई वडिलांच्या मुलांनी व लहानशा चिमुकल्यांच्या पालकांनी समजून घेणेही महत्त्वाचे आहे. असे एकमेव कारणही नसतील,यासारखी अनेक कारणे असू शकतात. शेवटी एकच की,घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भीती… नकोच नुसत्या भिंती..

इकबाल पिंजारी
लोकशाही ऐनपूर प्रतिनिधी
मो क्र : 9881969679

Leave A Reply

Your email address will not be published.