ऑक्टोबर हीट’ची चाहूल ; पारा ३४ अंशांवर

0

जळगाव ;– पावसाने उघडीप देताच राज्यात ‘ऑक्टोबर हीट’ची चाहूल लागली आहे. अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३४ अंशांच्या पार गेला आहे. राज्यात ऑक्टोबर हिटची चाहूल लागली आहे. राज्यातील तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे उकाडयात वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. आज राज्यातील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच पुढील पाच दिवस राज्यात मुख्यत: पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे. मागील तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेती कामांना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे.

आज राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तर उर्वरित राज्यात कोरड्या हवामानासह उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.