BCCI झालं ट्रोल, सव्वा लाख आसनक्षमता असलेलं स्टेडियम रिकामेच

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धेला म्हणजेच वनडे वर्ल्डकापला आजपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. या सामन्यादरम्यान स्टेडियम खचाकच भरले असेल, मात्र इथे चित्र काही उलटच बघायला मिळाले आहे. पहिल्याच सामन्यात स्टेडियम रिकामं असलीच दिसून आलं आहे. यावरून नेटकऱ्यांनी BCCI ला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेसाठीचे तिकीट ऑनलाईन विक्रीसाठी काढण्यात आले होते. मात्र साईट क्रॅश झाल्याने क्रिकेटप्रेमींना तिकीट मिळू शकलं नाही. तसेच साईट सुरळीत झाल्यानंतर तिकीट सोल्ड आऊट असं दिसून आलं. मात्र ओपनिंग सामन्याच्या दिवशी बुक माय शोने तिकीट विक्रीसाठी काढल्याचं दिसून आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.