पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क;
पारोळा तालुक्यात झालेल्या गारपीट, वादळी वाऱ्यासह पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी महाराष्ट्र राज्याचे पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या सह पारोळा येथील डॉ संभाजीराजे पाटील यांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, परिसरात नुकत्याच झालेल्या गारपीट व बेमोसमी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या सह डॉ संभाजीराजे पाटील यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन केली होती. तोंडाचा घास हिरावलेल्या शेतकरी बांधवांच्या वेदना समजून घेत डॉ संभाजीराजे पाटील यांनी त्वरित जिल्यातील मदत व पूर्वसन मंत्री श्री अनिल भाईदास पाटील यांच्याशी संपर्क करून याबाबत माहिती दिली. ज्यावर मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी त्वरित प्रतिसाद देऊन तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन अमळनेर आणि पारोळा येथे पाहणी दौरा केला. नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळावी यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना यावेळी उपस्थित अधिकारी यांना देण्यात आल्या. यावेळी तहसीलदार डॉ उल्हासराव देवरे, पोलीस निरीक्षक सुनील पवार, प्रशासकीय अधिकारी व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.