अजित डोवाल यांच्या बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न, एकजण ताब्यात

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या दिल्लीतील बंगल्यात एका अज्ञात व्यक्तीने घुसण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, बंगल्यात घुसणाऱ्या व्यक्तीला सुरक्षा रक्षकांनी रोखले असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक चौकशी केली जात आहे.

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, एनएसए अजित डोवाल यांच्या निवासस्थानी एका व्यक्तीने घुसण्याच्या प्रयत्न केला. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे. अज्ञात व्यक्तीचे डोवाल यांच्या बंगल्यात घुसण्याचे नेमके काय कारण होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सदर व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. संशयित व्यक्तीने चौकशीदरम्यान, आपल्या शरिरात एक चीप बसविली असल्याचे सांगत त्याचा रिमोट कोणीतरी कंट्रोल करत असल्याचे सांगितले आहे.

याआधी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी अजित डोवाल यांचे घर आणि कार्यालयाची रेकी केली होती. याबाबतचा खुलासा जैशचा दहशतवादी हिदायतुल्लाहने केला होता. त्याला जम्मू- काश्मीर पोलिसांनी अटक केली होती. उरी आणि बालाकोटमधील एअर स्टाइकनंतर पाकिस्तानमधील काही दहशतवादी गट अजित डोवाल यांच्याविरोधात घातपाताचा कट रचत असल्याची माहिती याआधी समोर आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.