निजामकालीन पोस्ट ऑफिस जीर्णावस्थेत…

0

 

धर्माबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क;

शहरात शंभर वर्षापुर्वीची निजामकालीन पोस्ट ऑफिसची इमारत असून, त्यात जुन्या भिंतीवरच सिंमेंटचा स्लॅब (छत) अकरा वर्षापुर्वी टाकण्यात आला होता. दीड वर्षांपूर्वी त्या जुन्या भिंतीची एक बाजू कोसळली तरीही त्याच अवस्थेत कर्मचारी जीव मुठीत ठेवुन कार्यालयीन काम करत आहेत. पण संबंधित अधिकारी, लोक प्रतिनिधी यावर लक्ष देत नसल्याने कर्मचा-यांमध्ये संताप आहे. ही इमारत कधीही कोसळेल याची भीती कर्मचाऱ्यांमध्ये आहे.

जुन्या भिंतीवर अकरा वर्षापूर्वी सहा लाख रुपये खर्च करून कोणतेही पिलर न लावता सिमेंटचे छत टाकण्यात आले होते. सध्या सतत पडत असलेल्या पावसामुळे भींती कधी कोसळतील अशी भीती कर्मचा-यांना वाटत आहे.

15 ऑगस्ट 2020 मध्ये कार्यालयाची जुनी भिंत छताच्या वजनाने कोसळली होती. भिंत हि रात्रीच्या वेळी कोसळल्याने कुठलीही जीवितहानी झाली नव्हती अन्यथा अनर्थ झाला असता. भिंत कोसळून दिड वर्षे झाले, मात्र कर्मचारी त्याच अवस्थेमध्ये जीव मुठीत ठेवून काम करत आहेत. यासंदर्भात संबंधित विभागाला पत्रव्यवहार करण्यात आला तरीही आजपर्यंत कोणीही लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिलेले नाही. केवळ दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रूपये लाटण्यात आले असे बोलेले जात आहे. धर्माबादचे पोस्ट ऑफिस जीर्ण इमारतीत चालणारे नांदेड जिल्ह्यातील एकमेव कार्यालय आहे असेही बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.