मुंबई बॉम्बस्फोटात दोषी असलेल्या आरोपीसोबत ठाकरे गटाच्या नेत्याची पार्टी; नितेश राणे

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

विधिमंडळाच्या आजच्या कामकाजादरम्यान बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता यांच्यासोबत पार्टी केल्याचा मुद्दा चांगलाच गाजला. भाजपचे नेते नितेश राणे, आशिष शेलार, आणि शिवसेनेचे नेते दादा भुसे यांनी सभागृहात हा प्रश्न उपस्थित करत सुधाकर बडगुजर यांची याप्रकरणी चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

यावर उत्तर देतांना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याचे म्हंटले आहे. फडणवीस सभागृहात बोलताना म्हणाले की, हा विषय अतिशय गंभीर आहे. बॉम्ब स्फोटात जे आरोपी आहेत, तसेच देशाचा शत्रू असलेल्या दाऊदचा जवळचा सहकारी सलीम कुत्ता यासोबत पार्टी करणं, खरतर हा पॅरोलवर बाहेर होता. त्यामुळे त्याला पार्टी देखील करता येत नाही. त्यामुळे त्याने पार्टी करायची आणि कोणीतरी जाऊन त्या पार्टीत नाचायचं हा गंभीर प्रकार आहे.

कुत्ता सोबत या संबंधित व्यक्तीचा काय संबंध आहे. अशी पार्टी करण्यात कोण-कोण होते. त्याला कोणाचा वरदहस्त होता का? हे तपासण्यात येईल. बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत कोणी पार्टी करत असेल तर त्याचा अर्थ संवेदना मेळ्यात असा होता. म्हणून मी सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की एसआयटीच्या माध्यमातून ठरवून दिलेल्या वेळेत या प्रकरणाची तपासणी होईल. तसचे दोषींवर कारवाई केली जाईल असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.