मल्याळम अभिनेत्री निमिषा सजयनची मराठी चित्रपटात एन्ट्री

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

सद्य परिस्थितीत बहुतांश मराठी चित्रपट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बाजी मारून सातासमुद्रपार देखील आपली छाप पडत आहे. ही अभिमानास्पद बाब असून यामुळे ईतर कलाकार मराठी चित्रपटांकडे लक्ष केंद्रित करत आहे. या गोष्टीचा प्रत्यय म्हणजे मल्याळम अभिनेत्री निमिषा सजयन ही आता हवाहवाई या मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

मल्याळम अभिनेत्री निमिषा सजयन हिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेलं असून ७ ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या हवाहवाई या चित्रपटात ती झळकणार आहे. अभिनेता विजय आंदळकर आणि अभिनेत्री निमिषा सजयन ही नवी जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत असून मोशन पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.