Thursday, February 2, 2023

आ. राजुमामा भोळे यांच्या प्रयत्नांना यश

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

नुकतेच महाराष्ट्र राज्यात भाजपा व शिवसेना नैसर्गिक युतीचे सरकार स्थापन झाले असून जळगाव शहराच्या विकासासाठी शहराचे लोकप्रिय आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांनी नगरविकास विभागातर्फे निधी उपलब्ध करून शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे होणेसाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे दि.०५ जुलै २०२२ रोजी पत्राद्वारे निधीची मागणी केली होती.

सदर मागणीवर तात्काळ निर्णय घेत दि.०७ जुलै २०२२ रोजी रस्त्यांच्या कामांसाठी ०५ कोटी रुपये मंजूर करून आमदार राजुमामा यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. शहरात रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या निर्णयामुळे शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

या निर्णयामुळे आ.सुरेश दामु भोळे (राजुमामा) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांचे आभार व्यक्त केले आहे.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे