निलेश राणे यांची डेक्कन परिसरातली मालमत्ता सील, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

पुणे महापालिकेने मालमत्ता कर न भरल्याने भाजप नेते निलेश राणे यांची मालमत्ता सील केली आहे. पुणे महापालिकेतून मिळालेल्या माहितीनुसार, भाजप नेते निलेश राणेंची तब्बल तीन कोटी ७७ लाख ५३ हजार रुपयांची मालमत्ता कराची थकबाकी आहे.

पुण्यातील डेक्कन परिसरात भाजप नेते निलेश राणेंची मालमत्ता आहे. या परिसरातील असलेल्या आर डेक्कन येथील व्यावसायिक जागेचा कर राणेंनी न भरल्याने संबंधित मालमत्ता महापालिकेने सील केली आहे. भाजप नेते निलेश राणेंच्या मालमत्तेची तब्बल तीन कोटी ७७ लाख ५३ हजार रुपयांची थकबाकी आहे. सध्या महापालिकेकडून कर वसुली केली जात आहे. राणेंच्या मालमत्ता थकबाकी प्रकरणी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आजची कारवाई केली आहे.

पुण्यात अनेकांनी मालमत्ता कर थकवला असून, निर्धारित वेळेत कर न भरल्यास थकबाकीसारांवर कारवाई केली जाणार असल्याची महापालिकेने आजच्या कृतीत दाखविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.