राष्ट्रीय विज्ञान दिवस निमित्ताने ‘ईकरा बोरनार’ येथे विज्ञान प्रदर्शन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

बोरनार इकरा एज्युकेशन सोसायटी जळगाव संचलित बोरनार गावातील अब्दुल मजीद सालार इकरा उर्दू हायस्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त वैज्ञानिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांना संशोधन आणि प्रयोगांसाठी प्रवृत्त करणे आणि त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे हा यामागचा विशेष उद्देश होता. दरवर्षी भारतात २८ फेब्रुवारी रोजी डॉ. सी.व्ही.रामन यांच्या महत्त्वपूर्ण शोधाच्या स्मरणार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. या प्रदर्शनात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेले सुमारे ३० मॉडेल्स सादर केले. प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक सलीम शाह यांच्या हस्ते करण्यात आले. या यशस्वी प्रयत्ना बद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे व विज्ञान शिक्षकांचे अभिनंदन केले. प्रदर्शनात प्रथम क्रमांक माहीन अक्रम देशमुख (10वी) व द्वितीय क्रमांक अल्फिया सय्यद अनिस(5 वी) हिने पटकावला. प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आले. विज्ञान शिक्षक आरिफ मोहम्मद खान यांना शेख अमीर हमीद आणि शेख रौशन जाफर यांनी सहकार्य केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी शेख जव्वाद अंजुम, फिरोज पठाण, शेख सादिक, मजहर खान यांचे सहकार्य लाभले. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये आकिब खाटीक, मुश्ताक भाई, युसूफ भाई, शब्बीर भाई यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.