विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी नवीन शैक्षणिक धोरण राबविणे हि सर्वांची नैतिक जबाबदारी – रवींद्र कुलकर्णी

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात “नवीन शैक्षणिक धोरण २०२० ची दूरदृष्टी व त्याचे कृतीत रुपांतर” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर कार्यशाळेचे दुसरे वक्ते व नवीन शैक्षणीक धोरण-२०२० अंमलबजावणीसाठी निर्गमित करण्यात आलेल्या टास्क फोर्सचे अध्यक्ष रवींद्र कुलकर्णी, रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमीक डीन प्रा.डॉ. प्रणव चरखा हे उपस्थित होते.

यावेळी रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा.डॉ. प्रिती अग्रवाल यांनी सांगितले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- 2020 ची अंमलबजावणी करणे हि आपली सर्वांची जबाबदारी असून स्वायत्त रायसोनी महाविद्यालयात डबल डिग्री प्रोग्राम, अॅकड्मिक बँक ऑफ क्रेडीट व मल्टी डिसीप्लिन अॅप्रोच आदीची रायसोनी महाविध्यालयात आधीपासूनच सुरुवात झाल्याने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- 2020 च्या दिशेने आमच्या महाविद्यालयाचे मार्गक्रमण सुरु आहे. तसेच नवीन शैक्षणिक धोरणामुळे अनेक पाश्यात्य शैक्षणिक संस्था भारतात येऊन त्यांच्या शैक्षणिक संकुलांद्वारे विद्यार्थांना शिक्षणाच्या अनेक नवनवीन संधी उपलब्ध होतील. आता पर्यंत भारतीय विद्यार्थी परदेशांत जाऊन डॉलरमध्ये त्यांची अर्थव्यवस्था बळक़ट करण्याचे काम करीत होता. ती बुद्धिमत्ता त्यांच्या प्रगतीसाठी खर्ची घालत होता. आता तोच विद्यार्थी भारतात राहून भारतीय अर्थव्यवस्थेचा आधार होईल. तसेच या धोरणामुळे शैक्षणिक संस्था, विद्यार्थी, शिक्षक, व्यवस्थापन सर्वांचेच उत्तरदायीत्व वाढणार आहे.

यानंतर मार्गदर्शन करतांना टास्क फोर्सचे अध्यक्ष रवींद्र कुलकर्णी यांनी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाची पार्श्वभूमी, सध्याची शिक्षणपद्धती, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि त्याची अंमलबजावणी, त्याची कार्यपद्धती आणि फलित तसेच शिक्षणक्षेत्रात त्यामुळे होणारे आमुलाग्र बदल, अशा विविध पैलूंची सविस्तर माहिती दिली ते म्हणाले, या धोरणात पदवी शिक्षण 3 किंवा 4 वर्षांचे असू शकते आणि या कालावधीत अनेक निर्गमन पर्याय आणि योग्य प्रमाणीकरण असू शकते. या धोरणात  अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिटची स्थापना केली जाईल जेणेकरून आपले शिक्षण हस्तांतरित करता येईल. तसेच आपल्या शैक्षणिक क्रेडिटची एक बँक स्थापन करून ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या उच्च शिक्षण संस्था मधून त्यांच्या शैक्षणिक काळात कमावलेली क्रेडिट अंतिम पदवीच्या वेळी संग्रहित आणि हस्तांतरित करण्यात मोठ्या प्रमाणात मदत होईल. तसेच बहुशाखीय शिक्षण आणि संशोधन विद्यापीठांची स्थापना (एमईआरयू), आयआयटी, आयआयएमच्या तोडीचे देशातील जागतिक दर्जाच्या सर्वोत्कृष्ट बहुशाखीय शिक्षणासाठी आदर्शवत म्हणून स्थापित केले जातील. तसेच भारतीय उच्च शिक्षण आयोगाची (एचईसीआय) स्थापना करण्यात येईल. उच्च शिक्षणात विषयांमध्ये लवचिकता प्राप्त होईल असे त्यांनी सांगितले.

यानंतर क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांनी नमूद केले कि, रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालय हे प्रथम असे महाविध्यालय आहे कि, ज्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- 2020 च्या अंमलबजावणीवर विचारमंथन करण्यासाठी हि कार्यशाळा आयोजित केली, त्यासाठी त्यांचे अभिनंदन तसेच त्यांनी सांगितले कि कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची देखील या भक्कम मार्गाने वाटचाल सुरु असून समिती स्थापन करून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यापीठाचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासबंधी विविध कार्य सुरु आहे व त्यानुसार चाॅइस बेस क्रेडीट सिस्टीम, संशोधन, बहुविध्याशाखीय दृष्टीकोन, अॅकड्मिक बॅक ऑफ क्रेडीट, स्टार्टअप या विषयांवर विद्यापीठ भर देत आहे. शेवटी नमूद करताना ते म्हणाले कि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर भविष्यात विद्यापीठ नक्कीच उत्तम काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सदर कार्यशाळेचे समन्वयक एमबीए विभागप्रमुख प्रा.डॉ. राजकुमार कांकरिया, एमसीए विभागप्रमुख रफिक शेख व प्रा. तन्मय भाले, प्रा. प्रतीक्षा जैन, प्रा. प्राची जगवाणी, प्रा. डॉली मंधान, प्रा. योगिता पाटील, प्रा. मोनाली शर्मा, प्रा. कल्याणी नेवे हे होते तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. राहुल त्रिवेदी यांनी केले. तसेच या कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितम रायसोनी यांनी कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.