चोरट्यांनी सकाळी १० वाजता फोडले बंद घर; दीड लाखाचा मुद्देमाल लंपास…

0

 

नशिराबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क:

नशिराबाद येथे चोरट्यांनी एक बंद घर फोडून तब्बल एक लाख ६९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल यात सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास केली आहे. ही घटना वाघुर कॉलनीमध्ये घडली आहे.

सविस्तर वृत्त असे की, चंद्रकांत देविदास पाटील (३४) रा. वाघुर कॉलनी, खालची अळी, नशिराबाद हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते १० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे बंद कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण १ लाख ६९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेण्याचे उघडकीला आले आहे. या बाबत नशिराबाद पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.