Saturday, October 1, 2022

शिंदे फडणवीस अमित शहांच्या भेटीस

- Advertisement -

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाल्यानंतर जनतेस आता मंत्रिमंडळ विस्ताराची उत्सुकता वाढीस लागली आहे. भाजप आणि शिंदे गटातील प्रमुख आमदारांमध्ये महत्वाच्या बैठका होत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुकतेच दिल्लीत आहेत.

- Advertisement -

- Advertisement -

महाराष्ट्रातील खाते वाटप संदर्भात दिल्लीतील भाजप श्रेष्ठींसमोर महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली रवाना झाले. आज उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्ली भेटीचा हेतू स्पष्ट करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हे सांगितले.

१८ तारखेला राष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या मागे पुढे खातेवाटप होऊ शकते. पावसाळी अधिवेशनापूर्वीच मंत्र्यांचा शपथविधी होईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातील कोणत्या आमदाराला कोणतं मंत्रिपद मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘दिल्लीतील आजची भेट सदिच्छा भेट आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या