घडामोडींना वेग !भाजपने दिल्लीत बोलावली NDA ची बैठक,पवारांची दांडी 

0

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क 

काल लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दिल्लीत आज एनडीए (NDA) आणि इंडिया आघाडीची (INDIA) महत्त्वाची बैठक होणार आहे.

एनडीएलला बहुमत मिळाल्यानंतर सत्तास्थापनेसाठी पुढील रणनीती ठरवण्यासाठी दिल्लीत आज बैठक होणार आहे.. या बैठकीला एनडीएचे घटक पक्षही उपस्थित राहणार आहेत. दरम्यान भाजपच्या सर्व विजयी खासदारांच्या व्यतिरिक्त घटक पक्षांच्या खासदारांनाही आज दिल्लीत येण्याच्या सूचना देण्यात आल्यात.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल (Praful Patel) या बैठकीला हजर राहणार असून अजित पवार या बैठकीला जाणार नाहीत.

भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या सर्व विजयी खासदारांव्यतिरिक्त घटक पक्षांच्या खासदारांना सकाळी दिल्लीला पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. NDA, TDP, JDU, HAM, LJP, RLD, JDS, जनसेना या सर्व घटक पक्षांशी बोलणी झाली आहेत. आजच्या NDA बैठकीत सरकार स्थापनेची ब्लू प्रिंट तयार होईल. आगामी सरकारमध्ये सर्व मित्रपक्षांना मानाचे स्थान दिले जाईल, खुद्द पंतप्रधान सर्व पक्षांच्या प्रमुखांचे विजयाबद्दल अभिनंदन करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.