राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन जल्लोषात साजरा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 23 वा वर्धापन दिवस पक्षाचे प्रमुख नेते व पदाधिकारी यांच्या उपस्थितित उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला.  जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब ऍड. रविंद्र पाटिल यांच्या हस्ते सकाळी 10.10 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ध्वज फडकविण्यात आला व उपस्थित सर्वांनी ध्वजवंदना देत राष्ट्रगीताचे गायन केले.

पक्ष कार्यालयात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब रवींद्र पाटिल व जिल्हा बँकेचे चेअरमन आप्पासाहेब गुलाबरावजी देवकर यांनी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित केले. देशाचे नेते शरद पवार साहेब यांच्या सक्षम नेतृत्वात आपल्याला काम करायला मिळत आहे हे आपले भाग्य आहे. पक्ष स्थापनेपासुन ते आजवर फक्त 5 वर्षांचा अपवाद वगळता पक्ष कायम सत्तेत आहे याचे सर्व श्रेय पवार साहेब यांनी केलेले कार्य व त्यांच्या विचारसरणीला आहे. कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची व पवार साहेबांची विचारधारा, कार्य सामान्य जनतेपर्यंत पोहोचवावी व जास्तीत जास्त जनहिताचे कार्य करावे म्हणजे जळगाव जिल्ह्यात देखील सर्व नगरपालिका, जिल्हा परिषद, महानगरपालिका ग्रामपंचायत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता येईल असे मत त्यांनी मांडले.

त्यानंतर केक कापुन सर्वांनी एकमेकांना पक्ष वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या व  पक्षातील जेष्ठ नागरिक पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.  आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयापासून स्वातंत्र्य चौक, नेहरू चौक, चौबे शाळा, चित्रा चौक, कोर्ट चौक  या मार्गाने शहारातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली व रॅलीची सांगता राष्ट्रवादी कार्यालयासमोर झाली. सदर रॅलीत कार्यकर्त्यांनी अत्यंत उत्साहात जोरदार घोषणा देत आसमंत दणाणून सोडले,  मोटरसायकल रॅलीत सुमारे 150 मोटरसायकल व 300 कार्यकर्ते सहभागी झाले.

सदर कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब ऍड. रवींद्र पाटिल, जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबरावजी देवकर, महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, प्रदेश चिटणीस एजाज मलिक, जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटिल, विकास पवार, महिला जिल्हाध्यक्षा वंदनाताई चौधरी, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटिल, महिला महानगर अध्यक्षा मंगलाताई पाटिल, वाल्मिक पाटिल, रिंकू चौधरी, अमोल कोल्हे,  अरविंद मानकरी, मजहर पठाण, राजू मोरे, रवी देशमुख, अश्विनीताई देशमुख, कल्पिता पाटिल, ऍड. राजेश गोयर, दत्तात्रय सोनवणे, भगवान सोनवणे, सुशील शिंदे,  सुनील माळी, अशोक सोनवणे, रमेश बाऱ्हे, अनिल पवार, अकिल पटेल, रहीम तडवी, जितेंद्र चांगरे, विशाल देशमुख, किरण राजपूत, नईम खाटिक, राहुल टोके, जितेंद्र बागरे, सूर्यकांत भामरे, राजू बाविस्कर आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वाय. एस. महाजन सर यांनी केले तर आभार प्रदर्शन रिंकू चौधरी यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.