Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीतर्फे निषेध
    ताज्या बातम्या

    आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीतर्फे निषेध

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 20, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ;- भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबीयांबाबत केलेल्या बेताल वक्तव्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाने निषेध केला. आकाशवाणी चौकात जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्रभैय्या पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात येऊन आमदार पडळकर यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या.

    भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन त्यांनी स्वत:च्याच सरकारला पत्र पाठवलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच त्यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे. यावेळी, त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना आपण मानत नसल्याचे म्हटले. तसेच, पडळकरांनी अजित पवारांचं नाव घेत, हे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू असल्याची घणाघाती टीका केली. तसेच खासदार सुप्रिया सुळे धनगर समाज आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेले असता पडळकर यांनी त्यांच्यावरही टीका केल्याने राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली आहे.

    जळगाव महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, युवक शहर जिल्हाध्यक्ष रिंकू चौधरी, महिला अध्यक्षा मंगला पाटील, वाल्मीक पाटील, अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष इब्राहिम तडवी, महानगर जिल्हा उपाध्यक्ष राजू मोरे, किरण राजपूत, रहिम तडवी, अकिलभाई पटेल, राजा मिर्झा, सबाज तडवी, अकील खान, चेतन पवार, हितेश जावळे, आकाश हिवाळे, खलील शेख, प्रमोद पाटील, विनोद धमाले, मयूर पाटील, गणेश सोनार, नईम खाटीक, राहुल टोके, बशीरभाई शाह, सुहास चौधरी, संजय चव्हाण, आप्पा मराठे, मुश्‍ताक खाटीक, वाहबभाई खाटीक, मंजूर पटेल, हेमंत खैरनार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

    #ncp jalgaon jode maro
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif