अभिनेत्री नयनतारा हिच्या अडचणीत वाढ, ८ जणांविरोधात गुन्हा दाखल

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा तिच्या ‘अन्नपूर्णानी’ चित्रपटामुळे अडचणीत आली आहे. या चित्रपटामध्ये हिंदू धर्माच्या भावना भडकवणारी दृश्य आणि विधाने वापरली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी नयनतारा आणि चित्रपटाच्या निर्मार्त्यांसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरूवारी या चित्रपटाच्या निर्मात्यांसह आठ जणांविरोधात मिरा भाईंदर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी या आठही जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अभिनेत्री नयनताराच्या नावाचा देखील समावेश आहे.

ओटीटीवर प्रदर्शित झालेला ‘अन्नपूर्णानी’ या चित्रपटाच्या निर्मात्यासह सात जणांविरोधात पहिलाच गुन्हा महाराष्ट्रामध्ये दाखल करण्यात आला आहे. मीरा-भाईंदर येथील हिंदू संघटनेचे कार्यकर्ते अरुप मुखर्जी यांनी नया नगर पोलीस ठाण्यात या चित्रपटाच्या टिमविरोधात तक्रार दाखल केली होती. या चित्रपटामध्ये लव्ह जिहादला प्रोत्साहन दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नया नगर पोलिसांनी मुखर्जी यांच्या तक्रारीनंतर अभिनेत्री नयनतारासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

अरुप मुखर्जी यांनी या चित्रपटात हिंदू समाजाच्या धार्मिक भावना भडकवणारी दृश्य आणि विधाने वापरल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. इतिहासाचा कोणताही पुरावा चित्रपटाचे लेखक, डायरेक्टर, प्रोड्युसर यांच्याकडे नसताना त्यांनी हिंदू देवी-देवतांबद्दल आक्षेपार्ह विधान या चित्रपटामध्ये वापरले आहेत. तसेच लव जिहाद या विषयाला जाणून बुजून या चित्रपटामध्ये प्रोत्साहित केले असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.