मलिकांना दिलासा, खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. त्यांना आता खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. नवाब मलिकांनी खासगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी न्यायालयाकडे केली होती.

न्यायालयाने मलिकांना तुर्तास दिलासा दिला असून त्यांना उपचारासाठी परवानगी दिली आहे. नवाब मलिक ईडी कोठडीमध्ये आहेत. मलिकांना जेजे रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेले होते. परंतु त्यांना ज्या व्याधी आहेत त्यावर जेजे रुग्णालयात उपचार होऊ शकत नाही अशी माहिती नवाब मलिकांनी दिली होती.

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात नवाब मलिकांना अटक करण्यात आले आहे. ते सध्या ईडी कोठडीत आहे. तब्येत ढासळल्यामुळे त्यांना जेलमधून स्ट्रेचरवरुन जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जेजे रुग्णालयात उपचार अपुरे पडत आहेत. नवाब मलिकांना जे आजार आहेत त्यावर जेजे रुग्णालयात उपचार होऊ शकत नाहीत. यामुळे खासगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी नवाब मलिकांनी कोर्टात केली होती.

नवाब मलिकांच्या मागणीवर कोर्टाने दिलासादायक निर्णय दिला आहे. नवाब मलिकांच्या आजारावर खासगी रुग्णालयात उपचार केले पाहिजेत असे पत्र रुग्णालयाकडून कोर्टात देण्यात आले होते. यामुळे कोर्टाने नवाब मलिकांना परवानगी दिली आहे. मलिकांसोबत घरातील एका व्यक्तीला राहण्याची परवानगी दिली आहे. न्यायाधीश राहुल रोकडे यांनी हे आदेश दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.