वाघूर नदीवरील नवीन पुल अपूर्ण तर जुना पुल वाहतूकसाठी धोकेदायक

0

वाकोद, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव – औरंगाबाद महामार्गावरील वाकोद फर्दापुर दरम्यान वाघूर नदीवर नवीन पुलाचे काम शेतकऱ्यांच्या तक्रारीमुळे थांबले आहे. तर जुन्या पुलावरून वाहतूक होत आहे. या जुन्या पुलाला ठिकठिकाणी तडे व भेगा पडलेल्या आहे. कठडे तुटलेले आहे. पुलाच्या खाली भागातून सिमेंट लोखंडी सळई गज मधून खाली पडत आहे. दिवसेंरात्र प्रवासी वाहन व अवजड हजारो वाहने या पुलावरून जात असतात. पावसाळ्यात हा पुल धोकेदायक होईल. जळगावच्या वाकोद जवळ सरहद्दवर हा पुल आहे. पुलाच्या पलीकडे औरंगाबाद जिल्ह्याची सीमा सुरू होते.

कुठल्याही प्रकारची पूर्व सुचना न देता नवीन पुलाचे काम सुरू केले. आमच्या शेतातील पाईप लाईनचे नुकसान केले. शेतातील सुबाभूळच्या झाडांचे नुकसान केले. नुकसान भरपाई बद्दल काहीही सांगितले नाही. म्हणून आम्ही जिल्हाधिकारीकडे तक्रार केली.

वाकोद येथील शेतकरी – हरकचंद जैन

Leave A Reply

Your email address will not be published.