विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

नाशिक ; नाशिक जिल्ह्यातील बाडगीचा पाडा (ता. दिंडोरी) येथे श्रतिका गणेश जाधव (२१) या विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. श्रतिकाचा विवाह दीड वर्षापूर्वी झाला होता. मात्र अनेक महिन्यांपासून ती माहेरी बाडगीचा पाडा येथे वडील सुदाम हिंडे यांच्याकडेच राहत होती.

रविवारी (दि.२७) सकाळी तिने साडेअकराच्या सुमारास घराच्या लोखंडी पाइपला स्कार्फद्वारे गळफास घेत आत्महत्या केली. पेठ येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. पेठ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप वसावे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.