महिला तलाठ्याचे बंद घर फोडले; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

0

फैजपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

फैजपूर (Faizpur) शहरातील श्रीकृष्ण नगरात वास्तव्यास असलेल्या महिला तलाठीचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून रोकडसह सोन्याचे दागिने असा एकुण १ लाख १९ हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लीना चेतन तळेले रा. खिरोदा ता. रावेर ह.मु. श्रीकृष्ण नगर, फैजपूर ह्या पती चेतन अरूण तळेले यांच्यासह वास्तव्याला आहे. त्या चिनावल येथे तलाठी म्हणून नोकरीला आहे. लिना तळेले यांच्याकडे इतर गावांचा अतिरिक्त पदभार असल्याने २६ फेब्रुवारी रोजी फैजपूर येथील घराला कुलूप लावून चिनावल येथे कामाला गेले. अतिरिक्त पदभार असल्यामुळे घरी जाण्यास उशीर होईल म्हणून सासरी खिरोदा येथे मुक्कामाला पतीसह थांबले होते.

बंद घर पाहून मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातील लोखंडी कपाटातून सोन्याचे व चांदीचे दागिने आणि २० हजाराची रोकड असा एकुण १ लाख १९ हजाराचा मुद्देमाल लंपास केला. तळेले कुटुंबिय रविवारी २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता घरी आले तेव्हा घरात चोरी झाल्याचे उघड झाले.

दरम्यान घटनास्थळी फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर यांच्यासह पोलीस पथक दाखल झाले. याप्रकरणी चेतन तळेले यांच्या फिर्यादीवरून सायंकाळी ५ वाजता फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक मोहन लोखंडे, हवालदार उमेश चौधरी, रवींद्र मोरे, ज्ञानेश्वर पवार हे करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.