पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा ताफ्यातील जवानाचा मृत्यू

0

नाशिक , लोकशाही न्यूज नेटवर्क
नाशिकच्या सिन्नर येथील जवान गोदावरी नदीच्या उजव्या कालव्यात वाहून गेले आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा ताफ्यात तैनात असून केंद्रीय राखुव सुरक्षा दलातील कार्य करत होते. शिर्डीवरून साईबाबांचे दर्शन घेऊन परत येत असताना ही घटना घडली. यावेळी जवानासोबत पत्नी आणि दोन मुलेही होती. अपघात झाल्यानंतर पत्नी आणि मुलांना स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. मात्र जवान गणेश गिते वाहून गेले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यातील एसपीजी (SPG) कमांडो गणेश सुखदेव गीते हे सुट्टीनिमित्त आपल्या गावी सिन्नर तालुक्यातील मेंढी येथे आले होते. गुरुवारी सकाळी ते पत्नी रुपाली गीते आणि मुलगा व मुलीसह शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. दर्शन घेऊन परत येत असताना गीते कुटंबियांसोबत मोठा अपघात झाला. या अपघातात एसपीजी कमांडो गणेश गीते यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या कुटुंबियांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे.

गीते कुटुंबिय नांदूरमधमेश्वर येथील उजवा कालव्यावरून घराकडे जात असताना गणेश गीते यांचा मोटरसायकलवरील ताबा सुटला. गीते यांचा मोटारसायकल थेट कालव्यात कोसळली. गणेश गीते यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि दोन्ही मुले पाण्यात पडली. पत्नी आणि मुलगा बाजूला पडल्याने त्यांना पटकन बाहेर काढण्यात आले. तर मुलगी आणि गणेश गीते हे पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जात होते. त्यावेळी एका स्थानिकाने पाण्यात उडी घेत दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र बचावकर्त्याला मुलीलाच वाचवता आले. पाण्याचा वेग जास्त असल्याने गणेश गीते यांचा मृत्यू झाला. एनडीआरएफचे पथक सध्या त्यांचा शोध घेत आहे.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.