नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क
आडगाव पोलिसांनी ड्रिंक ॲन्ड ड्राईव्ह करून वाहन चालविणाऱ्यांच्या धडक कारवाई सुरु केली असून, नाकाबंदी दरम्यान मद्यप्राशन केलेल्या वाहनचालकांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये ड्रिंक ॲन्ड ड्राईव्ह कारवाईसाठी नांदूर नाका तसेच आदी ठिकाणी शनिवारी (ता. २) रात्री विशेष नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली. यादरम्यान पाच वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
त्यांच्याकडून ६, ५०० रुपये दंड वासून, करण्यात आला आहे. यापुढे अशाच प्रकारची कारवाई करण्यात येणार असून, वाहनचालकांनी मद्यप्राशन करून, बेशिस्तपणे वाहन चालवू नये तसेच वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गणेश न्हायदे यांनी केले आहे.