मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड साजिद मिरवर विष प्रयोग

0

इस्लामाबाद : – मुंबईवर हल्ला करून अनेक निरपराध नागरिकांचा जीव घेणाऱ्या लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेतील साजिद मीर या दहशतवाद्यावर विषप्रयोग झाल्याची माहिती समोर येत असून विषप्रयोगानंतर साजित मीरची प्रकृती नाजूक आहे . सध्या तो व्हेंटिलेटरवर असल्याचे समजते. साजित मीर हा २६/११ च्या हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. त्याच्यावर विषप्रयोग झाल्याचं सांगितलं जात असलं तरी भारताकडे होणारे त्याचे प्रत्यार्पण थांबवण्यासाठी पाकनेच विषप्रयोगाचं नाटक रचल्याची शंका भारतीय तपास यंत्रणांना आहे.

साजिद मीर याला पाकिस्तानातील डेरा गाजी खानच्या मध्यवर्ती तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. तिथंच त्याच्यावर विषप्रयोग झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र याबाबत पाकिस्तानकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. प्रकृती बिघडल्यानंतर मीर याला एअरलिफ्ट करून बहावलपूर येथील सीएमएच इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या रुग्णालयात भरती करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.